समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात अवमान याचिका दाखल

0
588

अमरावती, दि.४ (पीसीबी) – नागपूर-मुंबई द्रुतगती समृध्दी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत राज्य शासन भूसंपादन कायद्याचे उलंघन करीत आहे. यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील शिवणी रसुलापूर येथील शेतकरी अमोल राजकुळे आणि मोरेश्वर वंजारी यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

आतापर्यंत ८५ टक्के शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित करण्यात आली आहे. यात असमान मोबदला देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. वास्तविक, शासनाच्या प्रतिज्ञापत्रानुसार २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये शेतकऱ्यांना मोबदला देणे गरजेचे होते. मात्र, सरकारच्या महत्वकांशी प्रकल्प असल्याचे सांगत शेतकऱ्यांना फसविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे याविरोधात ३० आक्टोंबरला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपिठात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.