समीर वानखेडेंची दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून २ तास चौकशी

0
248

नवी दिल्ली, दि.२६ (पीसीबी) : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात सुमारे २ तास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चौकशीनंतर वानखेडे हे एनसीबीच्या मुख्यालयातून बाहेर पडले आहेत.

कार्डिला क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अटकेत आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांना ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोप या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने केला होता. या आरोपाप्रकरणी वानखेडे यांची ही चौकशी झाल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. तर याबाबत एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले, “आपण कोणालाही चौकशीसाठी बोलावलेले नाही. समीर वानखेडे यांची चौकशी करायची असती तर त्यांना आपण बोलावले असते.”