समाजमाध्यमांतून फेक न्यूज पसरविल्यास कारवाईचा बडगा   

0
692

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – समाजमाध्यमांतून  जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरवण्याचे प्रकार वाढले आहेत.  समाजमाध्यमांतून सातत्याने पसरविल्या जात असलेल्या फेक न्यूजचा प्रसार आणि अन्य बदनामीकारक मोहिमांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला, तर त्यांच्या भारतातील प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस उच्च सरकारी समितीने केली आहे.

सोशल मीडियावरुन पसरवल्या जाणाऱ्या खोटया माहितीमुळे जमावाकडून  हत्या होण्याच्या तसेच दंगलीच्या घटना भारतात मोठ्या प्रमाणात  घडल्या आहेत. याबाबतचा अहवाल केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सादर केला आहे.

अलिकडच्या काळात भारतातील अनेक राज्यात सोशल मीडियावरुन पसरलेल्या फेक न्यूजमुळे जमावाने केलेल्या मारहाणीत अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. सोशल मीडियावरुन अफवा पसरुन सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत,  असे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, याबाबत मंत्रिगटाच्या बैठकीत भूमिका ठरवण्यात येईल. त्यानंतर तो अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला जाईल. यावर पंतप्रधान  मोदीच अंतिम निर्णय  घेतली.