Pune

समलैंगिक जोडीदारावर कोयत्याने वार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार

By PCB Author

September 24, 2018

पुणे, दि. २४ (पीसीबी) – वारंवार शरीरसुखाची मागणी केल्याने ४६ वर्षीय समलैंगिक जोडीदारावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणारा आरोपी तरुण रुग्णालयातून पसार झाला आहे. ही घटना आज (सोमवार) पुण्यातील कमलनयन रुग्णालयात  घडली.

अनुराग भाटिया (वय २३) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुरागचे पुण्यातील एका ४६ वर्षीय व्यावसायिकासोबत समलैंगिक संबंध होते. तो व्यावसायिक वारंवार अनुरागकडे शरीरसुखाची मागणी करत होता. यामुळे चिडून अनुरागने धारदार कोयत्याने बुधवारी (दि.१९) सकाळी सहाच्या सुमारास ४६ वर्षीय समलैंगिक जोडीदारावर प्राणघातक वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी अनुरागला अटक केली होती. त्याला आज पुण्यातील कमलनयन रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता तो तेथून पोलिसांची नजर चुकवून पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.