समलैंगिकता गुन्हा नाही; मानवतेचा सर्वात मोठा विजय – करण जोहर

0
779

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरूवार) दिला. हा निर्णय म्हणजे मानवतेचा सर्वात मोठा विजय आहे. आज देशाला त्याचा श्वास परत मिळाला आहे, अशा शब्दांत निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी या निकालाचे स्वागत केले आहे.

ऐतिहासिक निर्णय! आज मला प्रचंड अभिमान वाटत आहे. समलैंगिकता हा गुन्हा ठरू शकत नाही आणि आयपीसीचे कलम ३७७ रद्द करणे हा मानवतेचा सर्वात मोठा विजय आहे. देशाला त्याचा श्वास पुन्हा मिळाला, अशा शब्दात करणने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माझे अस्तित्व काय आहे, हे सगळ्यानांच माहिती आहे. पण मी स्वतःहून माझी ओळख सांगू शकत नाही. कारण मी अशा देशात राहतो ज्या देशात असे केल्याने मला शिक्षा होऊ शकते, असे करणने त्याच्या ‘ए अनसूटेबल बॉय’ या आत्मचरित्रात लिहिले आहे.