सफाई कर्मचाऱ्यांसाठी हजार घरे मुंबईत उपलब्ध देणार करुन धनंजय मुंडेंच अश्वासन

0
335

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – मुंबई शहरात पात्र सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी १६ हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते. मुंडे म्हणाले, राज्यातील सफाई कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरु आहे. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याबाबतचा विषयी मुख्यमंत्री महोदयांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.