सप्टेंबर महिन्यात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार

0
443

दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार आहे. शिवाय दोन वर्षांच्या आत सर्व ३६ राफेल विमानं भारताला मिळणार आहेत. फ्रान्स कंपनी दसॉल्ट एव्हिएशन राफेल विमानांची निर्मिती करत असून अत्याधुनिक अशा दोन  इंजिनांनी राफेल विमान युक्त आहे.

पहिल राफेल विमान येत्या सप्टेंबर महिन्यात भारताला मिळेल, असे संरक्षण उत्पादक विभागाचे सचिव अजय कुमार यांनी पीटीआयला सांगितले. तसेच फ्रान्सचे भारतातील राजदूत अॅलेक्झँडर जीगलर यांनीही सांगितले होते की, अपेक्षित वेळेच्या आधी राफेल विमाने भारताला मिळतील. त्यामुळे भारताला राफेल विमान दोन महिने आधीच मिळणार आहे. भारताने फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीकडून एकूण ३६ विमानांची खरेदी केली आहे. पुढील दोन वर्षांना हे सर्व  विमाने भारतीय वायू दलाच्या ताफ्यात दाखल होतील. राफेल विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यात सक्षम आहे. तसेच या विमानमध्ये आण्विक अस्त्रांचा वापर करण्याचीही क्षमता आहे.