Desh

सनी देओलच्या गाडीचा टायर फुटल्याने अपघात   

By PCB Author

May 13, 2019

गुरूदासपूर, दि. १३ (पीसीबी) – अभिनेते आणि भाजपचे लोकसभा उमेदवार सनी देओल कार अपघातातून बालबाल बचावले. गुरूदासपूरहून सनी अमृतसरला प्रचाराला जात होते. यावेळी त्यांच्या रेंज रोव्हर गाडीचा टायर फुटल्याने गाडी दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

सनी देओल आपल्या वाहनांच्या ताफ्यासह अमृतसर महामार्गावरून प्रचाराला निघाले होते. यावेळी एक गाडी चुकीच्या दिशेने आली. त्या गाडीला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले. नेमके त्याचवेळी टायर फुटून गाडी दुभाजकांवर जाऊन धडकली.

यावेळी गाडीच्या पाठीमागून येणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या एकमेकांवर जाऊन धडकल्या. मात्र, या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातानंतर सनी देओल दुसऱ्या गाडीने पुढील प्रवसाला रवाना झाले. सनी देओल गुरूदासपूरमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढवत आहेत