Desh

सनी देओलचा भाजपमध्ये प्रवेश; गुरुदासपूरमधून लोकसभा लढवणार?

By PCB Author

April 23, 2019

नवी दिल्ली,  दि. २३ (पीसीबी) – अभिनेता सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.     गुरुदासपूरमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता  आहे.  भाजप नेत्या निर्मला सीतारमन आणि पियूष गोएल यांच्या उपस्थितीत  सनी देओल यांनी आज (मंगळवार) प्रवेश केला.   

चार दिवसांपूर्वी   दिल्लीत भाजप अध्यक्ष  अमित शहा यांची भेट सनीने  घेतली होती. त्यावेळी यांनी अमृतसरमधून निवडणूक लढवावी,  असे शहा यांनी सनीला सांगितल्याची चर्चा होती.  मात्र, सनी देओल गुरूदासपूरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

भाजप प्रवेशानंतर सनी म्हणाले की, माझे वडील माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत होते. आज मी नरेंद्र मोदींसोबत आहे. पुढील पाच वर्षे तेच पंतप्रधानपदी राहावेत, अशी माझी इच्छा आहे. आता मी या कुटुंबात सहभागी झालो आहे.  शक्य  तितके नक्कीच करून दाखवणार आहे.  मी  बोलण्यापेक्षा काम करून दाखवणार आहे, असे सनी  म्हणाले.