Maharashtra

सध्या वाईट दिवस आहेत माझे चांगले काम करताना त्रास होतोच

By PCB Author

February 17, 2020

बीड, दि.१७ (पीसीबी) – निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे बीड जिल्ह्यातील आष्टीतील कड्याजवळच्या कुंभारवाडीमध्ये रविवारी दुपारी किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनाला येताना इंदुरीकर महाराजांचे जंगी स्वागत करण्यात आले.

या कीर्तनामध्ये बोलताना ते म्हणाले की, माझे दिवस सध्या वाईट आहेत, चांगले काम करताना एवढा त्रास होतोच. या विषयावर मला काहीच बोलायचे नाही, असे मत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केले. मी घरच्यांसाठी कमी व समाजासाठी जास्त वेळ देत आहे. ते चुकीचे वाटत असेल तर मला वेगळा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

यावेळी सुरेश धस म्हणाले, इंदुरीकर महाराज जे बोलले त्यात गैर काय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांना नोटीस पाठवणे चुकीचे आहे.

विशेष म्हणजे ‘आय सपोर्ट इंदुरीकर’ अशा नावाचे फलक घेतलेले लोक या कीर्तनामध्ये सहभागी झाले होते. महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशाही आशयाचे फलक लोकांच्या हातात होते.