सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे नवे राज्यपाल

0
902

श्रीनगर, दि. २३ (पीसीबी) – सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरचे नवे   राज्यपाल म्हणून आज (गुरूवार) शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी (दि.२१ ) जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी सत्यपाल मलिक यांच्या नावाची घोषणा केली होती. याआधी एन. एन. व्होरा हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. व्होरा यांनी पाच-पाच वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत.

उत्तर प्रदेशातील बागपतमधील गरीब कुटुंबात सत्यपाल मलिक यांचा जन्म झाला. मेरठ महाविद्यालयामध्ये त्यांनी महाविद्यायीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी  राजकारणात प्रवेश केला.

१९७४ ते १९७७ या काळात सत्यपाल मलिक हे उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार होते. त्यानंतर १९८०-८६ आणि १९८६-१९९२ या काळात राज्यसभेवर गेले. १९८९-१९९१ या काळात लोकसभेवर १९८९ मध्ये अलिगढ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. बिहार, ओदिशा या राज्यांचे राज्यपालपदही त्यांनी भूषवले आहे.