सांगलीत काँग्रेसला धक्का; सत्यजित देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश  

0
419

सांगली, दि. १६ (पीसीबी) –  सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि  दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.   महाजनादेश यात्रा कराडमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

भाजपाची महाजनादेश यात्रा आज (सोमवार) कराडमध्ये दाखल झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देणार  असल्याची घोषणा शिराळ्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली होती. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसला  मोठा धक्का  बसणार आहे

स्वार्थावर उभा राहिलेल्या राष्ट्रवादीची शकले उडायली लागली आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला. सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले, अशा शब्दात  राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर  देशमुख यांनी हल्ला चढवत देसमुख यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली होती.