Desh

सत्तेत आल्यास बालविवाह करण्यास परवानगी देणार; भाजप महिला उमेदवाराचे आश्वासन  

By PCB Author

December 02, 2018

जयपूर, दि. २ (पीसीबी) – एकदा मी सत्तेत आले की, या परिसरातील लोकांना बालविवाहासंबंधी पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही. बालविवाहात कोणतीही दखल पोलिसांना घेऊन  देणार नाही, असे आश्वासन भाजप उमेदवार शोभा चौहान यांनी दिले आहे.  राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी त्या दुसऱ्यांदा रिंगणात उतरल्या आहेत. यावेळी त्या प्रचार सभेत बोलत होत्या.

या वादग्रस्त वक्तव्यामुळे  त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. शोभा चौहान  सोजात येथून निवडणूक लढवत आहेत. ही जागा महिलांसाठी राखीव आहे. जर मी निवडून आले तर पोलीस बालविवाहात दखल देणार नाहीत, असे आश्वासनच त्यांनी देऊन टाकले आहे. दरम्यान भाजपने आपल्या उमेदवाराने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिय दिलेली नाही.

शोभा चौहान या आयएएस अधिकारी राजेश चौहान यांच्या पत्नी आहेत. एकदा मी सत्तेत आले की या परिसरातील लोकांना बालविवाहासंबंधी पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही. या वक्तव्यानंतर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.