Maharashtra

सत्ता गेल्याचे पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली – धनंजय मुंडे

By PCB Author

December 07, 2019

महाराष्ट्र, दि.७ (पीसीबी) –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृक्षतोडप्रकरणी आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि नाणार प्रकल्पांना विरोध करणाऱ्या कार्यकर्ते तसेच इतर काही प्रकरणात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला

याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. ‘नशीब…कसाबला फाशी झाली. नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते…’, असे ट्वीट अवधुत वाघ यांनी केले होते.

नशीब…
कसाबला फाशी झाली
नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते….

— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) December 4, 2019

तसेच राष्ट्रवादीचे नेते व नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. ‘सत्ता गेल्याचे पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत,’ असे मुंडे म्हणाले.

सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून 'वाघा'सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत.आपल्या हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी करताना यांना लाजा वाटत नाही का?भाजपच्या नेतृत्वाने या वाचाळवीराच्या नीच वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची ताबडतोब माफी मागावी.@Avadhutwaghbjp pic.twitter.com/PvQ5z4TGBI

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 5, 2019