सत्ताधारी भाजपा विरूध्द राष्ट्रवादी जुंपली आयुक्त राजेश पाटील यांच्या विरोधात भाजपा आक्रमक

0
469

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष आता तीव्र होऊ पाहतो आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा विरोधात महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर पाणी प्रश्नावर जोरदार आंदोलन करून आगामी काळात विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर बोलून भाजपाचा पंचनामा करायचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, भाजपाने आपल्या अपयशाचे खापर थेट महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यावर खापर फोडून आता थेट प्रशासनाला राष्ट्रवादी धार्जीने ठरवले असून प्रसंगी मोठा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. खुद्द महापौर माई ढोरे, सत्ताधारी नेते नामदेव ढाके उपमहापौर नानी घुले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत प्रशासनाच्या विरोधात रान उठवणार असल्याचे सांगितले आहे.

शहराला २४ तास पाणी तसेच दिवसाआड पाण्याचा निर्णय मागे घेऊन रोज पाणी देण्यात सत्ताधारी भाजपाचे प्रशासन अपयशी ठरल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने सकाळी महापालिका भवन दानाणून सोडले. संजोग वाघेर यांच्यासह राष्ट्रवादीचे तमाम नगरसेवक व पदाधिकारी यांनी भाजपाचा अक्षरशः पंचनामा केला. पाच वर्षआंत भाजपा कुठे किती अपयशी ठरली त्याची कुंडलीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वाचली. साध्या पाणी प्रश्नावरसुध्दा भाजपाला लक्ष देता आले नाही म्हणून जोरदार घोषणाबाजी केली. भाजपाच्या दोन्ही आमदारांचे नाव न घेता दादा, भाऊंचा जोरदार उद्दार करत ओ माई पाणी द्या, अशा घोषणाही राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व नगरसेवकांचा हा पवित्रा पाहून भाजपा प्रचंड अस्वस्थ झाली.

दरम्यान, दुपारच्या सुमारास महापौर माई ढोरे यांच्या कक्षात एक पत्रकार परिषद झाली. महापौर माई ढोरे, सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी संयुक्तपणे आपल्या व्यथा मांडताना महापालिका प्रशासनानला अक्षरशः लक्ष्य केले. ते म्हणाले, आयुक्तांनी कामे अडवली आहेत म्हणून आता आम्हाला थेट त्यांच्या विरोधात मोर्चा काढावा लागेल. लोकांच्या हिताची कामे ते अडवतात. करतो करतो म्हणतात आणि निमित्त काढून कामे अडवतात. प्रभागांतील असंख्य कामे समिती नेमतात आणि थांबून ठेवतात. अगदी एककल्ली कार्यक्रम सुरू केला आहे. आयुक्तींनी राज्यातील महाआघाडी सरकारची सुपारी घेतली आहे, असा गंभीर आरोप महापौर माई ढोरे यांनी केले. प्रभाग रचनेत सुध्दा आयुक्तांनी राज्य शासनाच्या दबावाखाली काम केला असून त्या विरोधात आम्ही कार्टात जाणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांसाठी ३००० टॅब खरेदीचा आमचा आग्रह आहे, पण तो विषयसुध्दा आयुक्तांनी थांबवला. महिला बाल कल्याण योजनेतून महिलांसाठी वाहन प्रशिक्षण (ड्रायव्हींग) चा कार्यक्रम आम्ही सुचवला पण त्यालाही निमित्त काढू खोडा घातला.
अनेक वार्डातील कामेसुध्दा थांबवली आहेत. कुठल्याही कामाचे टेंडर काढून देत नाहीत. आयुक्त हे आता आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यांनी सुपारी घेतली आहे, असा गंभीर आरोप महापौर माई ढोरे यांनी केला.