Maharashtra

सतत पैशांची मागणी करणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराकडून चाकूने वार करून खून

By PCB Author

June 29, 2019

अहमदनगर, दि. २९ (पीसीबी) – सतत पैशांची मागणी करणाऱ्या प्रेयसीचा  प्रियकरानेच चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे   घडली आहे.  या घटनेमुळे  परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी  सुभाष गव्हाणे यांनी  पारनेर पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर आरोपी गोविंद उर्फ पप्पु सुरेश ढवण याला मुंबईतील गोवंडी परिसरातून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कोहकडी येथील संध्या गव्हाणे या विवाहित महिलेचे गावातीलच गोविंद उर्फ पप्पु सुरेश ढवण याच्याशी अनैतिक संबध होते.  संध्या गव्हाणे ही गोविंदकडे सतत पैशाची मागणी करत होती.  यामुळे गोविंद वैतागलेला होता.  संध्या घराजवळ पाणी घेऊन येत असताना तिच्यावर त्याने चाकूने सपासप वार केले.  हातावर,बरगडीवर चाकूचे वार झाल्याने ती गंभीर जखमी  झाली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला.