सततच्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत

0
659

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मागील तीन दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. शहरातील निगडी ओटास्कीम, पिंपरी आणि भोसरीतील फुलेनगर भागात आज (सोमवार) ठिकठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले. तसेच भोसरीतील नेहरुनगर-भोसरी रस्त्यावरील नारी (नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट) समोर झाडे कोसळ्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सध्या शहरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शहर परिसरातील धरण देखील पूर्णपने भरले आहेत. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील इंद्रायणी आणि पवना नदी तुडूंब भरल्या आहेत. पावसाचा जोर कायम असल्यास शहर परिसरात पूरजण्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.