Maharashtra

सचिन तेंडुलकर शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

By PCB Author

March 30, 2019

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – भारताचा  माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज (शनिवार)  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. ही भेट नियोजित होती. दोघांमध्ये सकाळी १०.४५  ते ११.१५  दरम्यान अर्धा तास चर्चा  झाली. मात्र, या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे  सचिनने घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.  सचिन आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. खासगी कारणांसाठी ही भेट घेतली असल्याचे सूत्रांकडून  सांगितले जात आहे.