सचिन तेंडुलकरचे पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

0
661

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – महाराष्ट्रसह देशातील काही राज्यात महापुराने थैमान घातले आहे. या महापुरात एकूण २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर  भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आला आहे.  सचिनने ट्विट करुन पुरपरिस्थितीबद्दल माहिती देत पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता पाण्याची पातळी कमी झाल्याने परिस्थितीमध्ये आधीपेक्षा सुधारणा होत आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातून या पूरग्रस्तांना मी मदत केली आहे. तुम्हीही पूरग्रस्तांना मदत करा आणि पाठिंबा द्या, असे ट्विट सचिनने केले आहे.  या ट्विटबरोबर त्याने पुराचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.

दरम्यान,  ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अनेक कलाकार गाजावाज न करता पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे म्हटले आहे.  देशात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीतील पीडितांना अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी पुढे येऊन मदत करीत आहेत. मात्र, ते या गोष्टी बोलून दाखवत नाहीत. त्याचबरोबर मलाही स्वतःला कोणालाही कळू न देता कोणत्याही धर्मादाय संस्थेला मदत करायला आवडेल, असे  बच्चन यांनी  म्हटले आहे.