Bhosari

सचिन चिखले, सुमन पवळेंच्या हस्ते यमुनानगरमधील दत्त मंदिरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमीपूजन

By PCB Author

December 31, 2018

भोसरी, दि. ३१ (पीसीबी) – निगडी, यमुनानगर, स्किम क्रमांक ९ येथील दत्त मंदिरात रंगीत पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचे मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीच्या माजी सभापती व विद्यमान नगरसेविका सुमन पवळे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

निगडी, यमुनानगरमधील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शनासाठी दररोज शेकडो नागरिक येत असतात. मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी मनसेचे गटनेते सचिन चिखले आणि नगरसेविका सुमन पवळे यांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

या दोघांच्या पाठपुराव्यामुळे दत्त मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या कामाचे भूमीपूजन मनसेचे गटनेते सचिन चिखले आणि स्थायी समिती माजी सभापती व विद्यमान नगरसेविका सुमन पवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यमुनानगरमधील ज्येष्ठ नागरिक तसेच मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.