Desh

सगळ्यात जास्त फेक फॉलोअर्सच्या यादीमध्ये दीपिका आणि प्रियांका

By PCB Author

August 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी)- बॉलिवूड स्टार्सचे सोशल मीडियावर कसे लाखो फॉलोअर्स आहेत याची चर्चा नेहमी होत असते. अनेक सेलिब्रिटी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करतात. सेलिब्रिटींच्या प्रत्येक फोटोला लाखो लाइक्स, कमेंट्स मिळत असतात.

परंतु सेलिब्रिटींच्या अकाऊंटवरील अनेक फॉलोअर्स फेक असल्याचा दावा करण्यात आला आहे. सगळ्यात जास्त फेक फॉलोअर्स असलेल्या कलाकारांच्या यादीमध्ये बॉलिवूडची मस्तानी दीपिका पडुकोण आणि प्रियांका चोप्रा पहिल्या दहा सेलिब्रिटींमध्ये आहेत.