Maharashtra

सकाळी ११ पर्यंत ३८ टक्के मतदान

By PCB Author

April 26, 2024

दि २६ एप्रिल (पीसीबी ) – महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान होत आहे. आठ मतदारसंघांत अटीतटीची लढाई होणार आहे. देशातील ८९ जागांवर आज सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. देशात भाजपा प्रणीत NDA विरुद्ध काँग्रेस प्रणीत INDIA अशी लढत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी देशात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळपासून चांगली सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी उत्साहात सुरूवात झाली तर काही ठिकाणी मतदानाचा निरुत्साह दिसून आला. सामान्य मतदारांसह अनेक दिग्गज नेत्यांसह लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांनी देखील त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.