संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या ( पिंपरी चिंचवड शहर ) शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा…

0
599

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : भारतीय संविधान दिवसाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र संघटन, पुणे युवा कार्यक्रम एव्ं खेल मंत्रालय तर्फे स्वच्छ भारत अभियान २०२१ – २०२२ चा जिल्हा स्तरीय पुरस्काराने संस्कार प्रतिष्ठानला आज सन्मानित करण्यात आले..

या कार्यक्रमाचे आयोजन नेहरु युवा केंद्र पुणे,जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन पुणे येथे स्वच्छ भारत जिल्हा स्तरीय पुरस्कार वितरणाचे आयोजन केले होते.प्रमुख पाहुणे श्री प्रकाश कुमार मनुरे राज्य संचालक नेहरु युवा केंद्र महाराष्ट्र / गोवा,श्री यशवंत मानखेडकर उपसंचालक नेहरु युवा केंद्र पुणे,मा क्रांती खोब्रागडे उपायुक्त आयकर विभाग,डॉ कुणाल खेमणार उपायुक्त घनखचरा व्यवस्थापन मनपा पुणे,श्रीयुत आण्णा बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड मनपा,श्री जीवन बच्छाव संयुक्त आयुक्त आयकर विभाग पुणे, श्री अजित देशमुख होते.पुणे जिल्ह्यातुन सामाजिक संस्थांचा दिला जाणारा प्रथम पुरस्कार संस्कार प्रतिष्ठानला पवना नदी स्वच्छता अभियान राबविले तसेच २५ पोती प्लॕस्टीक जमा केले सलग तिन महिने पिंपरी चिंचवड मनपा व पुणे मनपा हद्दीत राबविले त्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी आण्णा बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांनी संस्कार प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.संस्कार प्रतिष्ठानचा पुरस्कार स्विकारताना ते टिम सोबत होते.

सहभाग घेणाऱ्या प्रत्येक सभासदाला प्रमाणपत्र देऊन कौतुक केले.सन्मानचिन्ह शाल व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड,संचालिका सौ प्रतिभा पुजारी,सौ सायली सुर्वे,सौ पल्लवी नायक,प्रभाकर मेरुकर,विजय आगम,आनंद पुजारी,वैश्नवी पुजारी यांनी श्री जीवन बच्छाव संयुक्त आयुक्त आयकर विभाग पुणे यांच्या हस्ते स्विकारला. सुत्रसंचालन सौ शोभा कुलकर्णी यांनी केले होते.