संविधान दिनानिमित्त हिंजवडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना रोपांची भेट

0
422

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – संविधान दिनानिमित्त ताथवडे येथील मल्हार प्रतिष्ठानकडून हिंजवडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना रोपे भेट देण्यात आली.

ताथवडे येथील वृक्षमित्र सचिन पवार यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात हा स्तुत्य उपक्रम राबविला. दहा वर्षापूर्वी मुंबई शहरावर झालेल्या अतिरेकी हल्यातील शहीद पोलीस बांधवांना व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मल्हार प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन पवार, अमोल पवार, प्रसाद पवार, समीर वाघुले आदी उपस्थित होते.