Maharashtra

संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, माफी मागण्याचा प्रश्नच नाही – वारीस पठाण

By PCB Author

February 21, 2020

महाराष्ट्र,दि.२१(पीसीबी) – ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजपा आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे.’ असं स्पष्टीकरण ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांनी दिलं आहे.

“१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण करणारं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यावर त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मी जे काही म्हटलेय ते संविधानाच्या मर्यादेतच राहून बोललो असल्याचं स्पष्टीकरण वारीस पठाण यांनी दिलं आहे.

दरम्यान, वारीस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारीस पठाण यांच्या टीका केली आहे.