Desh

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली अभिनंदनची भेट

By PCB Author

March 02, 2019

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी  आज (शनिवारी) भेट घेऊन विचारपूस केली. जखमी अभिनंदन यांच्यावर सध्या दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी अभिनंदन यांनी हवाई दलप्रमुख बी.एस. धनोआ यांची भेट घेऊन त्यांना पाकिस्तानच्या ताब्यात असताना  घडलेल्या घडामोडींची  माहिती दिली.  पाकिस्तानच्या एफ-१६ या लढाऊ विमानाचा निकराने प्रतिकार करताना अभिनंदन यांचे  मिग-२१ विमान कोसळले . त्यानंतर ते पॅराशूटच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले.

पाकिस्तानी लष्कराने  अभिनंदन यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, अभिनंदन यांना  शुक्रवारी (दि.१) भारताच्या ताब्यात  देण्यात आले.  अभिनंदन यांचे देशात आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.  अभिनंदन यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या घेण्यात येणार आहेत.