संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूराबद्दल तावडेंनी माफी मागावी – धनंजय मुंडे

0
820

बीड, दि. १३ (पीसीबी) –  छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेल्या पुस्तकाचे केवळ वितरण थांबवून चालणार नाही. तर लेखक, प्रकाशकावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच  शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

सर्व शिक्षा अभियानच्या ‘समर्थ रामदास स्वामी’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी छापण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे शिवप्रेमींमध्ये  संतापची भावना निर्माण झाली आहे.   याबाबत धनंजय मुंडे यांनीही ‘लेखक, प्रकाशक कैफात आहेत का? असा संतप्त सवाल केला आहे.

या पुस्तकाचे वितरण थांबवून चालणार नाही तर, लेखक, प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करून विनोद तावडे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.