संभाजी भिडे कुणाच्या आमंत्रणावरून आले होते? हे राहुल गांधींनी सांगावे – आंबेडकर

0
549

परभणी, दि. १७ (पीसीबी) – सांगली काँग्रेस कमिटीत झालेल्या जवानांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी संभाजी भिडे कुणाच्या आमंत्रणावरून आले होते? हे कदाचित काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना माहिती नसेल, पण त्याची माहिती घेवून संबंधिताला पक्षातून काढून टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी  म्हटले आहे.

परभणी येथे वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन परिषदेत आंबेडकर बोलत होते.

शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगली काँग्रेस कमिटीत आयोजित जवानांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला  उपस्थित लावली होती. काँग्रेस कमिटीतून निघालेल्या मूक पदयात्रेतही ते सहभागी झाले होते. यावरून आंबेडकर यांनी काँग्रेसला कोंडीत पकडले आहे.

आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस आम्हाला त्यांच्या सोयीने वापरून  घेत आहे. मात्र आम्ही त्यांना मालक होवू देणार नाही. त्यांच्या वैचारिक बांधिलकीविषयी मला राहूल गांधींना प्रश्न विचारायचा आहे. संभाजी भिडेंना कोणी बोलावून घेतले होते, याची माहिती घेवून संबंधिताला त्यांनी पक्षातून काढून टाकले पाहिजे. तरच तुम्ही सेक्युलर आहात, असे आम्ही समजू, असे आंबेडकर म्हणाले.