संभाजी भिडें विरोधात वारकरी आक्रमक, पालखीत घुसू न देण्याची केली मागणी

0
502

पुणे दि, २५ (पीसीबी) – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळ्यात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना या वर्षी पोलिसांनी पालखीसमोर चालण्यास मज्जाव घातल आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या वादामुळे, वारकऱ्यांने मागील वर्षांपासून भिंडे आणि त्यांच्या समर्थकांना पालखी सोहळ्यात घुसू न देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे होती.

त्यामुळे संभाजी भिडे आणि त्यांचे कार्यकर्ते हे पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमणार असून सर्व पालख्या पुढे गेल्यावर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहेत. तसेच परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहावा यासाठी पालखी सोहळा समितीच्या वतीने यावेळी देखील पुणे पोलिसांना पत्र देण्यात आले असून, पालखी सोहळ्यात कोणालाही घुसू देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही, असे बजावले आहे.

यापूर्वी संभाजी भिडे आणि त्यांचे कार्यकर्ते हे आषाढी वारीसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसोबत धारकरी पालखीसोबत सहभागी होत असत. मात्र दोन वर्षापूर्वी पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली होती. त्यामुळे गेल्यावर्षीपासून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गात घुसण्यास विरोध होत असून तो विरोध यंदाही कायम ठेवण्यात आला आहे.