Maharashtra

संभाजी भिडेंनी स्त्रियांबद्दल केले वाद्ग्रस्थ वक्तव्य; मुलं नसणाऱ्या स्त्रियांना म्हणाले…

By PCB Author

December 26, 2019

सांगली,दि.२६(पीसीबी) – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. यावेळेस त्यांनी थेट गरोदर स्त्रियांबद्दल बोलताना पुन्हा भिडे गुरुजींचा तोल सुटला, मुलं नसणाऱ्या स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोलताना भिडे यांनी “वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते,” असं वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये भिडे नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल बोलत होते. यावेळी त्यांना गरोदर स्त्रियांचा अपमान करणारे वक्तव्य केले. “जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं तसचं वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंच झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रित्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे,” असं भिडे म्हणाले.

राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज नपुंसक आहे असं म्हणताच भिडे यांनी मुस्लीमांकडून राष्ट्रवादीची अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे असंही भिडे म्हणाले. “राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आम्ही कमी पडतो. सुधारित नागरिकत्व कायदा भारतीयांना जोडणारा आहे. असं असतानाही काहीजण याबद्दल संभ्रम पसरवताना दिसत आहेत,” असं भिडे म्हणाले.