संभाजीनगर नावावरुन राज्यात चर्चा, तीन पक्ष मिळून तोडगा काढू : गुलाबराव पाटील

0
291

जळगाव, दि. 8 (पीसीबी): औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ही पूर्वीपासूनच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती आजची घोषणा नाही. कोणत्याही शिवसैनिकांनी औरंगाबाद नावं कधीच घेतलं नाही तर संभाजीनगर आलं आहे. संभाजीनगर नाव देणं हे काही चुकीचं नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नामांतर करण्यावरुन राजकारण सुरु आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांसह अनेक विरोधी पक्षांकडून टीका टिप्पणी सुरु आहे. त्यावर नुकतंच मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ही पूर्वीपासूनच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती आजची घोषणा नाही. कोणत्याही शिवसैनिकांनी औरंगाबाद नाव कधीच घेतलं नाही तर संभाजीनगर आलं आहे. संभाजीनगर नाव देणं हे काही चुकीचं नाही. संभाजीनगरच्या नावावरुन राज्यात चर्चा होत आहे. तरी या विषयावर तीन पक्ष तोडगा काढणार आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
हिंदूत्व कोणाच बदललं आणि कोणाचा बदललं नाही हे कोणाच्या सांगण्यावरुन सिद्ध होत नाही. शिवसेनेचा जन्मच हिंदूत्वापासून झालेला आहे. शिवसेना जेव्हा राज्यात आली तेव्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आली, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

शिवसेना हा हिंदुत्वाच्या मुद्यावर आमदारकी गमावलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिला आमदार विलेपार्लेमधून निवडून आला. त्यांची निवडणूक फक्त हिंदुत्वाच्या मुद्यावर रद्द झाली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विसरू नये, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे