Desh

संबित पात्रा पावसाळी बेडूक, पाऊस येताच डरॉव डरॉव करतात – नवज्योतसिंग सिद्धू

By PCB Author

May 12, 2019

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची तुलना बेडकांशी केली आहे. संबित पात्रा हे पावसाळी बेडूकासारखे आहेत. पाऊस येताच ते डरॉव डरॉव करत असतात, असा टोला सिद्धू यांनी ट्विट करून  लगावला आहे.

सिद्धू यांनी एका प्रचार सभेमध्ये बोलताना भाजपच्या  नेत्यांवर आपल्या भाषेत टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाना साधला. या सभेतील एक व्हिडीओ क्लीप सिद्धू यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे.

दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘काळे इंग्रज’म्हणून पंतप्रधान  मोदी यांच्यावर टीका केली होती.  त्यावर संबित पात्रा यांनी प्रतिउत्तरादाखल म्हटले होते की, मोदी जर ‘काळे इंग्रज’ आहेत तर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी या भारतीय आहेत का?, संबित पात्रा यांच्या या प्रश्नाचा समाचार घेणारे ट्विट सिद्धू यांनी केले आहे.