संध्याकाळी पाचनंतर रस्त्यावर येणाऱ्या सर्व व्यक्तींवर होणार कारवाई पोलिसांनी उचलले कठोर पाऊल

0
528

 

पनवेल, दि.८ (पीसीबी) – राज्यात लॉकडाऊन असून देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच नागरिकांना आवाहन करून देखील नागरिक रस्त्यावर उतरून फिरत आहेत.

याच पार्श्वभूमीवर रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी पनवेल पोलिसांनी कठोर पाऊल उचलत सायंकाळी ५ वाजल्यानंतर संपूर्ण बाजार पेठ बंद होणार असल्याचा फतवा जारी केला आहे.

संध्याकाळी पाचनंतर सर्व दुकाने, रिलायन्स मार्ट, बिग बाजार, फळ-भाजीपाला मार्केट, फिश मार्केट बंद राहणार आहे. फक्त हॉस्पिटल, केमिस्ट आणि एपीएमसी सुरु राहणार आहे. संध्याकाळी पाचनंतर रस्त्यावर येणाऱ्या सर्व व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.

देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही कोरोबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे १४ एप्रिलला संपणारे लॉकडाऊन पुढे तसेच चालू ठेवण्याचा विचार केंद्र आणि राज्य सरकारकडून होत आहे. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतरही केंद्र सरकारने गर्दीची ठिकाणे जसे की, मंदिर, मॉल, शाळा-कॉलेज, इतर धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे निर्णय घेतला आहे.