संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे ग्रामीण-शहरी भागातील ३५ सरकारी रुग्णालय उद्यान होणार चकाचक..

0
348

पुणे,दि.२०(पीसीबी) – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा मिशनचे चौथे सद्गुरू बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या ६६व्या जयंती निमित्त रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत विशाल स्वच्छता अभियान पुणे जिल्हयातील ३५ सरकारी रुग्णालय व उद्यानामध्ये राबविण्यात येणार आहे. या स्वछता अभियानामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे ५००० हुन अधिक स्वयंसेवक,सेवादल, अनुयायी आपला सहभाग दर्शवतील.

संत निरंकारी मिशन चे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंह जी महाराज यांनी संदेश दिला होता की “प्रदूषण आतील असो किंवा बाहेरील दोन्ही हानिकारक आहेत”. त्यांच्या शिकवणुकीनुसार ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून आत्मिक शुद्धतेसाठी जागोजागी सत्संगचे आयोजन करण्यात येते. तसेच आपला जन्मदिवस साजरा करत असताना आपल्या सभोवताली असणारी रुग्णालय,उद्यान व इतर सार्वजनिक ठिकाणी स्वछता अभियान,वृक्षारोपण करावे असा आदेश आपल्या अनुयायींना दिला होता. या दिवशी संपूर्ण भारत देशातील ११६६ हुन अधिक रुग्णालय व उद्यान स्वच्छ होणार आहेत.

या स्वच्छता अभियानामध्ये पिंपरी-चिंचवड,पुणे शहरातील वाय.सी.एम. सरकारी रुग्णालय,औंध जिल्हा रुग्णालय,निगडी सरकारी रुग्णालय,पौड सरकारी रुग्णालय,ससून सरकारी रुग्णालय,हडपसर सरकारी रुग्णालय, पाषाण सरकारी रुग्णालय,सासवड सरकारी रुग्णालय ,रेहुड पार्क लोणावळा अशा ३५ रुग्णालय व उद्यानांचा समावेश करण्यात आला आहे.

या सामाजिक उपक्रमामध्ये समाजातील नागरिकांनी सहभाग घ्यावा व आपले शहर स्वच्छ ठेवावे असे आवाहन संत निरंकारी मंडळ पुणे झोन चे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी केले आहे.