Chinchwad

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनने स्वच्छता मोहिमेअंतर्गत औंध रुग्णालय परिसर केला चकाचक

By PCB Author

February 25, 2019

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने सद्गुरू बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त २३ फेब्रुवारी रोजी देशभरातील ९२५ सरकारी रुग्णालय, ५० उद्यान, शाळा, बसस्थानक स्वछ करण्यात आले. तसेच एक लाख वृक्ष लागवडीची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील औंध ऊरो रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून रूग्णालय परिसर चकाचक करण्यात आले.

पुणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये २६ सरकारी रुग्णालय, ४ सार्वजनिक उद्यान सुमारे ५००० स्वयंसेवकांनी स्वतः स्वच्छता दूत बनून स्वच्छ केली. पिंपरी-चिंचवडमधील औंध सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये पिंपरी, काळेवाडी, वाल्हेकरवाडी, सांगवी, चिंचवड, पिंपळेनिलख अशा विविध भागातून स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिला तसेच युवक वर्गाचा मोठा सहभाग होता. या अभियानामध्ये औंध रुग्णालयातील प्रवेश भाग, वाहनतळ, निवासी इमारती, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानाला संयोजक संत निरंकारी मंडळाचे गिरधारीलाल मतनानी यांनी स्वचछता मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे आभार मानले.