संतापजनक: वाकडमध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर लघुशंका करुन कोयत्याने वार

0
453

वाकड, दि. १९ (पीसीबी) – घराजवळील ओट्यावर झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर एकाने लघुशंका केली. तसेच त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना सोमवारी (दि. १७) रात्री साडेबाराच्या सुमारास सुदर्शन कॉलनी वाकड  येथे घडली.

शिवमूर्ती जाकते (वय ६५, रा. सुदर्शन कॉलनी, वाकड) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा किरण जाकते (वय २३) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी उर्फ विकास अडागळे (रा. म्हातोबानगर, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण याचे वडील शिवमूर्ती हे सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घराजवळील दुकानासमोर असलेल्या ओट्यावर झोपले होते. यावेळी आरोपी विकी अडागले तेथे आला. त्याने शिवमूर्ती यांच्या अंगावर लघुशंका केली. यामुळे ते गडबडून झोपेतून उठले. दोघांमध्ये वाद झाला. आणि विकीने त्याच्या जवळील कोयत्याने त्यांच्या डोक्यात सपासप वार केले. या घटेनत शिवमूर्ती गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर घटनेनंतर आरोपी विकी हा पसार झाला आहे. वाकड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.