संतापजनक: अल्पवयीन मुलींची तस्करी रोखण्यासाठी रेखाटण्यात आलेल्या जनजागृतीपर संदेशांची विटंबना

0
612

कोलकाता, दि. १५ (पीसीबी) – कोलकाताच्या रस्त्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी रोखण्यासाठी जनजागृतीपर संदेश रेखाटण्यात आले आहेत. मात्र काही समाज कंटकांनी या चित्रांची देखील विटंबना केल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

२०१४ पासून कोलकातासह देशभरातील काही महत्त्वाच्या शहरात ‘The Missing Public Art Project’ सुरू आहे. लहान मुलींना पळवून नेऊन त्यांना बळजबरीने देहविक्रेय करण्यास भाग पाडले जाते अशा मुलींची सुटका करणे किंवा असे प्रकार पोलिसांच्या तातडीने निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न ‘The Missing Public Art Project’ द्वारे केला जातो. याद्वारे मोठ्या प्रमाणात समाजात जनजागृती केली जाते. या मोहिमेचा एक भाग कोलकाता शहरातील भिंतीवर पोलिसांचा क्रमांक लिहण्यात आला आहे. त्याचबरोबर बाजूला लहान मुलीची सावली रेखाटण्यात आली आहे. मात्र या चित्राची कशा प्रकारे समाजातील काही विकृत मानसिकतेच्या व्यक्तींकडून विटंबना करुन खिल्ली उडवली जाते हे या चित्रातून दिसून येते.