संज्या बेळगावात जाऊन कार्यक्रमात कर्नाटक सरकारची चाटून आला – निलेश राणे

0
683

मुंबई,दि.१९(पीसीबी) – बेळगावमध्ये एका कार्यक्रमानिमित्त शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे गेले होते. यावरूवन भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार टिका केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

“संज्या बेळगावात जाऊन कार्यक्रमात कर्नाटक सरकारची चाटून आला. उलट आता तिथली संघर्ष समिती संज्यालाच शिव्या घालत असेल… उगाच ह्याला बोलावलं म्हणत असेल, अशा शब्दांत निलेश राणे यांनी ट्विट केला आहे.

संजय राऊतला जेव्हा कळतं फटाके पडणार तेव्हा हा लगेच पायावर पडतो. आम्हाला ह्याची सवय माहीत आहे, असं म्हणत निलेश यांनी संजय राऊत यांच्या स्वभाव गुणदोषावर देखील भाष्य केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी बनवण्यात संजय राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली त्यावेळीही निलेश यांच्या निशाण्यावर संजय राऊत होते. संजय राऊत यांच्या ट्वीटला निलेश खोचकपणे उत्तर देत होते, हाच सामना आता महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर देखील पाहायला मिळतोय.