‘संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरावा’; ‘या’ भाजप नेत्याने केली मागणी

0
470

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी शरद पवार यांचे नेतृत्व सर्वांनी स्वीकारावे असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यासंदर्भात बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना मुख्यमंत्री केले तर महाराष्ट्राची प्रगती वेगाने होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.

संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरावा असंही मुनगंटीवर म्हणाले. ते चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षण उपसमितीवरून काँग्रेसचे नेते अशोक चव्हण यांना हटवा, अशीही मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची मदत सरकार का घेत नाही? मदत घेण्यात काय वावगे आहे? असाही प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.