संजय राऊत यांना पदावरुन दूर करा – संभाजी भिडे

0
394

सांगली, दि.१७ (पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. यानिमित्ताने समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी उदयनराजेंचा अपमान सहन करु शकत नाही असं सांगत संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी मागणी केली. वागताना बोलताना तारतम्य बाळगावे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. तसंच बंद असताना कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाऊ नये असे आवाहन यावेळी त्यांनी केले. देशाने आदर्श घ्यावा असे बंद पाळला पाहिजे असे संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितले.

जर शिवसेनेतील कोणी इतके बेताल वक्तव्य करत असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला करावे. समाजाचे स्वास्थ बिघडवू नये,” अशी मागणी संभाजी भिडे यांनी यावेळी केली.

“संजय राऊत असो किंवा गोयल असो, शिवरायांच्या परंपरेला कलंक लागेल असे वागलेल चालणार नाही. संजय राऊत यांनी ठिणगीला पाय लावला आहे. ते त्या स्थानावर राहता कामा नये. संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती आहे,” असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.