संजय राऊत यांच्या भेटीसाठी आशिष शेलार लीलावती रूग्णालयात दाखल!

0
407

मुंबई,दि.१२ (पीसीबी)  लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी भाजपचे नेते आशिष शेलार लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

संजय राऊत यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अँज्युओप्लॅस्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ते रुग्णालयात आहेत.

भाजप आणि शिवसेना यांची बोलणी फिस्कटल्या नंतर भाजपकडून कोणताही नेता संजय राऊत यांच्या भेटीला येणार नाही असं वाटत होतं. मात्र आशिष शेलार यांनी त्यांची रूगण्यालयात जाऊन त्यांची विचारपूस केली आहे.