संजय राऊत पिसाळलेला कुत्रा – निलेश राणे

0
795

मुंबई,दि.१६(पीसीबी) – पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना संजय राऊत, “मी दाऊद इब्राहिम पासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊद इब्राहिमला दम देखील दिला आहे,” असं म्हणाले. त्याचबरोबर “बाळासाहेब ठाकरे माझी फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून द्यायचे,” अशी आठवणही यावेळी राऊत यांनी करुन दिली.यावरुनच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत यांची तुलना निलेश राणे यांनी थेट पिसळलेल्या कुत्र्याबरोबर केली आहे.

“मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला आहे,” या संजय राऊतांच्या वक्तव्य म्हणजे चांगला विनोद असल्याचा टोला निलेश राणे यांनी ट्विटरवरुन लगावला आहे. “खूप दिवसांनी चांगला जोक वाचला. मला माहित नाही नवीन कायदा काय आहे पण पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता. संज्या सारखा लुक्का दाऊदला दम भरायला लागला म्हणून दाऊद संपला. संज्या आताच्या आता पाकिस्तानात दम भरायला सुरू कर,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.

निलेश राणे यांनी अशाप्रकारे शिवसेनेच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करुन टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांनी ट्विटवरुन संजय राऊत यांच्याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे.