संजय राऊतांनी घेतली राज्यपालांची भेट…

0
380

मुंबई , दि. २३ (पीसीबी) : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल आणि सरकार यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती.

“राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत, खूप दिवस व्यक्तीशा भेटलो नव्हतो, बऱ्याच दिवसापासून भेट राहिली होती, त्यामुळे सदिच्छा भेट घेतली, असं संजय राऊत यांनी या भेटीनंतर सांगितलं. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, एखाद्या पिता-पुत्राने त्यांचे संबंधत आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत काय म्हणाले?
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, पिता-पुत्राने आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत. उदय सामंत यांनी मत व्यक्त केलं, राज्यपाल हे कुलपती आहेत, त्यांनी त्यांचं मत सांगितलं, त्याबाबत सरकार-संबंधित मंत्री निर्णय घेतील.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे-माझे जुने संबंध, राज्यपालांना सरकार काय करतंय याची माहिती आहे.
विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन थेट बातचीत करायला हवी.