Maharashtra

संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश करणार

By PCB Author

August 25, 2019

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – अनेक नेते, कार्यकर्ते भाजप, शिवसेनेत प्रवेश करत असताना अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. संजय दत्त  २५  सप्टेंबर रोजी  राष्ट्रीय समाज पक्षा मध्ये प्रवेश करणार  आहे, असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे मंत्री  महादेव जानकर यांनी केला आहे.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी  जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. संजय दत्त यांचा आजच पक्षात प्रवेश होणार होता.  मात्र, काही कारणास्तव ते येऊ शकले  नाहीत, असे जानकर यांनी सांगितले.

दरम्यान, अभिनेता संजय दत्त यांनी एका व्हिडिओद्वारे रासपच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  जानकर हे माझ्या भावासारखे असून त्यांना मी शुभेच्छा देतो. मी येथे असतो तर नक्कीच त्यांच्या मेळाव्याला आलो असतो, असे संजय दत्तने म्हटले आहे.  आता संजय दत्त रासपमध्ये प्रवेस करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.