Maharashtra

संजय दत्तच्या रासप प्रवेशाच्या विधानावर महादेव जानकरांचे घूमजाव

By PCB Author

August 26, 2019

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – अभिनेता संजय दत्त यांच्या  राष्ट्रीय समाज पक्षाच्या  (रासप) प्रवेशाच्या विधानावर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घूमजाव केले आहे. संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे  मी कधीच म्हटले नव्हते, असे   जानकर यांनी  म्हटले आहे.

महादेव जानकर म्हणाले की,  संजय दत्त रासपामध्ये प्रवेश करणार नाहीत. प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.  संजय दत्त केवळ रासपचा प्रचार करणार आहेत.  आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाचा प्रचार करणार असल्याचे संजय दत्त यांनी मला आश्वासन दिल्याचे जानकर यांनी सांगितले.

दरम्यान, रासपच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन रविवार (दि.२५)  दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर झाला.  याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती होती.  या मेळाव्यात बोलताना  जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.