Pune

संघाची विचारधाराच देशाचे चित्र बदलू शकते – नितीन गडकरी

By PCB Author

February 11, 2019

पुणे, दि. ११ (पीसीबी) – पैसा आणि मनुष्य यामध्ये माणूस महत्त्वाचा. माणूस आणि संघटन यात संघटन महत्त्वाचे. संघटन आणि विचारधारा यात विचारधारा महत्त्वाची आहे, असे एका तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे. त्यामुळे  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाची विचारधाराच देशाचे चित्र बदलू शकते, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.  

जनसेवा सहकारी बँकेच्या हडपसर येथील मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते  करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गडकरी म्हणाले की,  स्थापत्य अभियांत्रिकीमधील मला काही समजत नाही. परंतु, मला काम करण्याची संधी मिळाली आहे. कमी वेळात जास्त काम करायचे आहे. त्यामुळे देश पुढे जाणार आहे. हा विचार ठेवून काम करत आहे, त्यामुळे मी इतकी कामे करू शकतो.