संकल्प मानव विकास संस्था व मशाल संस्थेच्या वतीने होतकरू गरजु महिलांना प्रशिक्षण व मोफत शिलाई मशीनचे वाटप

0
436

– महापौर उषाताई (माई) ढोरे यांच्या शुभहस्ते रहाटणीत वाटप

पिंपरी दि.१८ (पीसीबी) : संकल्प मानव विकास संस्था महाराष्ट्र व मशाल संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील गरजु व होतकरू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप रहाटणीत महापौर उषाताई माई ढोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, या लाभार्थी महिलांना तीन महिने संस्थेच्या वतीने प्रशिक्षण देऊन या शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

“संकल्प मानव विकास संस्था, महाराष्ट्र मागील तीन वर्षापासुन पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असुन आजतागायत २२५ महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण देऊन १४४ महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाली आहे, महिला सबलीकरण व आर्थिक सक्षमीकरण धोरणांतर्गत होतकरू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ही संस्था कायम कटिबद्ध असते, महिला बचत गटांना व आर्थिक दुर्बल घटकांतील होतकरू महिलांना विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हेच ध्येय डोळ्यासमोर सामाजिक बांधिलकी जपली आहे,” असे मत संकल्प मानव विकास संस्थेचे प्रमुख महादेव खंडागळे यांनी यावेळी व्यक्त केले.

सदरच्या कार्यक्रमास महापौर उषाताई (माई) ढोरे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव साळवे यांच्या शुभहस्ते या मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी मशाल संस्थेच्या मंगल गायकवाड, स्मिता सोंडे या प्रमुख उपस्थित होत्या, कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माया काळभोर, संगीता काळभोर, ज्योती गायकवाड, स्वाती कांबळे, सुवर्णा ओहाळ, जयश्री म्हेत्रे, पुनम यांनी परिश्रम घेतले तर रेखा तुपे यांनी सूत्रसंचालन केले.