संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो – जितेंद्र आव्हाड

0
296

 

मुंबई, दि.६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री ९ वाजताचा महाड येथी चवदार तळ्याचा फोटो ट्वीट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो. ज्ञानसुर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर) तेव्हाही तळपत होताच… आजही तळपतोच आहे. महाडची परंपरा कायम, #जय_भीम #अब_आगे_क्या, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

अंधारात कधीही चांगली कामे होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा’, असे म्हणत त्यांनी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली होती.

जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत. त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त १०१ रुपये द्या आणि त्याचा स्टेट्स आपल्या व्हॉट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा, अशी विनंतीही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केली आहे.