श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात जेडीएसचे ७ सदस्य गायब – एच. डी. कुमारस्वामी

0
434

नवी दिल्ली, २२ (पीसीबी) – श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात सुमारे ३०० नागरिकांचा जीव गेला. या घटनेचे पडसाद भारतातदेखील उमटले आहेत. या बॉम्बस्फोटाचे धक्के कर्नाटकात देखील जाणवले आहेत. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर जीडीएसचे  ७ सदस्य गायब झाले आहेत, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.  यामुळे  कर्नाटकात  खळबळ उडाली आहे.

कुमास्वामी यांनी सांगितले की,जीडीएसचे सात सदस्य श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. साखळी बॉम्बस्फोटानंतर हे   सदस्य गायब झाले आहेत. या घटनेमुळे मला धक्का बसला आहे.  या बॉम्बस्फोटात २ जणांचा  मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात  आहे.  या सदस्यांची माहिती  घेण्यासाठी भारतीय  उच्च आयुक्तांच्या संपर्कात आहे,  असे कुमारस्वामी यांनी सांगितले.

दरम्यान, ईस्टर संडे दिवशीच श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने  हादरून गेला.  चर्च आणि हॉटेलमध्ये  ८ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. या स्फोटात  मृतांचा आकडा  २९० वर पोहचला आहे. यात ३ भारतीयांचा समावेश आहे.  मृतांमध्ये ३५ हून परदेशी नागरिकांचा समावेश आहे.  दरम्यान,  या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवाद्यांनी जबाबदारी घेतलेली नाही.