Videsh

श्रीलंका: सुरक्षा रक्षकांना मोठे यश; इसिसच्या १५ दहशतवाद्यांना कंठस्नान

By PCB Author

April 27, 2019

श्रीलंका, दि. २७ (पीसीबी) – श्रीलंकेत झालेल्या बॉबम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर इथल्या सुरक्षा रक्षकांनी देशाच्या पूर्व भागातील इस्लामिक स्टेटशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली, यावेळी झालेल्या चकमकीत १५ दहशतवादी ठार झाले आहेत.

श्रीलंकेच्या लष्कराचे प्रवक्ते सुमित अटापटू यांनी शनिवारी सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी जेव्हा कलमुनई शहरात बंदुकधाऱ्यांच्या ठिकाण्यांवर घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. यामध्ये इस्लामिक स्टेटचे १५ दहशतवादी ठार झाले. या चकमकीत एक स्थानिक नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला आहे.